
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, CNG, खाद्य तेलाच्या किंमतीपासून ते अगदी भाजी पाल्यापर्यंत सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत. त्यातच वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला असताना RBI ने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम बँका, लोन घेणारे आणि तुमच्या आमच्या खिशावर होणार आहे.
RBI ची तीन दिवस मॉनिटरी पॉलिसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये रेपो रेट वाढवण्यासंदर्भात चर्चा झाली असून तूर्तास सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढत्या महागाईमध्ये रेपो रेट वाढवण्यात आलेला नाही. तो आहे तसाच स्थिर ठेवण्यात आला आहे. दर तीन महिन्यांनी RBI ची यासंदर्भात बैठक घेतली जाते. मागच्या मिटिंगप्रमाणे याही मिटिंगमध्ये रेपो रेट न वाढवण्यावर RBI ठाम आहे.
